Trailer of 'Maya' released which deepens the emotional

नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित!

नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित!

Mumbai: नातेसंबं

धांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. कारण ते केवळ कथा सांगत नाहीत, तर आयुष्यात व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना शब्द देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘माया’ या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘माया’चा ट्रेलर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो, माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गैरसमजुती, मनात साचत जाणाऱ्या अढी आणि त्या अढीमुळे दुरावत जाणारी माणसं यांचा भावनिक प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आयुष्य पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता आणि समजूतदार संवाद यांची जाणीव करून देणारा हा ट्रेलर विचार करायला भाग पाडतो.
चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका ट्रेलरमध्ये मध्यवर्ती ठरते. मुलीमध्ये रमलेला पण स्वतःच्या भावनांपासून काहीशी दूर गेलेली ही व्यक्तिरेखा मनाच्या खोल कप्प्यात डोकावते. मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा आयुष्याच्या वळणावर उभी राहून स्वतःचे प्रश्न शोधताना दिसते, तर विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांचे अनुभवसंपन्न अस्तित्व कथेला स्थैर्य आणि वास्तवाची किनार देते. ट्रेलरमध्ये प्रत्येक पात्राच्या नजरेतून वेगवेगळ्या वेदना आणि आशा डोकावताना दिसतात.
विशेष म्हणजे, ट्रेलरमध्ये संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणं, शांतता आणि प्रसंगांची मांडणी अधिक बोलकी ठरत आहेत. काही क्षण तर असे आहेत की, शब्दांशिवायही मनात खोलवर ठसतात. गिरीश ओक यांची भूमिका या भावविश्वाला वेगळा परिमाण देते. त्यांच्या व्यक्तिरेखेतील अंतर्गत संघर्ष, न सांगितलेले आघात आणि स्वतःभोवती उभारलेली भिंत यामुळे कथानकाला एक गूढ आणि गंभीर स्वर मिळतो. ट्रेलरचा शेवट आश्वासक असला तरी तो अनेक प्रश्नही उभे करतो आणि याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर मिळणार आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘’ ‘माया’ मधून प्रत्येकाच्या मनात दडलेल्या, व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात काही नाती आपण जपतो, तर काही नकळत तुटत जातात. पण प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी संचित देऊन जातं. या कथेतून आम्हाला हे मांडायचं आहे की, भूतकाळाच्या सावल्या कितीही गडद असल्या तरी एकमेकांमधील संवाद आणि कुणाचातरी मायेने झालेला स्पर्श यांच्या जोरावर आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करता येणं शक्य असते. प्रेक्षकांना या प्रवासात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल,अशी आम्हाला खात्री आहे.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

From Ananya Panday, Disha Patani to Shubhangi Dutt: B-Town Actresses Who Aced the Mirror Selfie Game

Print 🖨 PDF 📄 eBook 📱From Ananya Panday, Disha Patani to Shubhangi Dutt: B-Town Actresses Who Aced the Mirror Selfie Game Mumbai: Mirror selfies have become a celebrity staple, giving fans a peek into everything from glamorous looks to effortless off-duty style. From Ananya Panday and Disha Patani to Shubhangi Dutt, these B-Town actresses have […]

‘Aazma Le’ by Vishal Dadlani salutes the Unbreakable Spirit of The Indian Airforce in Netflix’s Operation Safed Sagar

Print 🖨 PDF 📄 eBook 📱‘Aazma Le’ by Vishal Dadlani salutes the Unbreakable Spirit of The Indian Airforce in Netflix’s Operation Safed Sagar Mumbai: Following the powerful response to the first track ‘Dilwaale Dilsaaz Parinde’ from Operation Safed Sagar, Netflix unveils Aazma Le presented by T-Series – an electrifying anthem that captures the courage, grit […]