Selected as closing film at New York Indian Film Festival 2026

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप!

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘तिघी’ची प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ (एनवायआयएफएफ)मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘तिघी’ क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून जाहीर करण्यात आले असून, या घोषणेमुळे चित्रपटाच्या यशात आणखी भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
आई-मुलीच्या नात्यांतील गुंतागुंत, त्यांच्या मनात दडलेले भावविश्व, न बोललेले संवाद आणि काळानुसार बदलणारे नाते या सगळ्यांचा अत्यंत सूक्ष्म आणि वास्तववादी वेध या चित्रपटात घेतला आहे. कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांची नैसर्गिक अभिनयशैली यामुळे ‘तिघी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आई-मुलीच्या नात्यातील भावना सार्वत्रिक असतात. त्यामुळे मुंबई असो किंवा न्यूयॉर्क, या चित्रपटाची कथा जगभरातील प्रेक्षकांना जोडते व आपलीशी वाटते.
यापूर्वी या संचाच्या ‘पुणे ५२’, ‘जून’, ‘गोदावरी’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांनी एनवायआयएफएफमध्ये आपली छाप पाडली होती. आता ‘तिघी’ हा चित्रपट या प्रतिष्ठित महोत्सवात दाखल होणारा त्यांचा पाचवा चित्रपट ठरला आहे. एनवायआयएफएफने सातत्याने त्यांच्या आशयप्रधान चित्रपटांना व्यासपीठ दिले असून, यंदा ‘तिघी’ला क्लोजिंग फिल्मचा मान देत ही परंपरा अधिक दृढ केली आहे.
याबद्दल दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “एनवायआयएफ सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तिघी’ची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड होणे ही आमच्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा चित्रपट अतिशय वैयक्तिक आणि मनाला भिडणाऱ्या नात्यांवर आधारित आहे. प्रेक्षकांनी त्याला दिलेले प्रेम आमच्यासाठी खूप खास आहे. एनवायआयएफएफने याआधी आमच्या चित्रपटांना दिलेल्या व्यासपीठानंतर, ‘तिघी’ला मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी आणखी खास आणि भावनिक आहे.”
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Soniya Bansal Shares Her Perspective on Industry Gatekeeping, Celebrity Culture, and the Changing Entertainment Landscape

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Soniya Bansal Shares Her Perspective on Industry Gatekeeping, Celebrity Culture, and the Changing Entertainment Landscape Mumbai: Actress Soniya Bansal, known for her work in films such as Naughty Gang, Dubki, Game 100 Crore Ka, Shoorveer, and the Telugu film Yes Boss, has steadily carved a niche for herself in the […]