marathi-actress-suparna-shyam-in-a-strong-role-in-it

‘ऊत’ मध्ये सुपर्णा कणखर भूमिकेत

‘ऊत’ मध्ये सुपर्णा कणखर भूमिकेत

Mumbai: छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच ‘ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी ती कशारीतेने हाताळते हे पहायला मिळणार आहे. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुपर्णा सांगते, ‘या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही ‘ऊत’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सुपर्णा सोबत राज मिसाळ, आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम आदि कलाकारांच्या सुद्धा यात भूमिका आहेत. ‘ऊत’ चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Instagram will load in the frontend.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

Print 🖨 PDF 📄 eBook 📱‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण […]

‘Mercy’ Trailer Sparks Conversation Around Passive Euthanasia and Human Dignity; Film Set to Release on April 24

Print 🖨 PDF 📄 eBook 📱‘Mercy’ Trailer Sparks Conversation Around Passive Euthanasia and Human Dignity; Film Set to Release on April 24 Fetching content== Mumbai: Following an acclaimed journey across international film festivals, award winning film Mercy is now set to come closer to home. The official trailer unveiled digitally on April 10, offering a […]