marathi-movie-uttar-will-soon-come-on-zee-5-for-audience

मराठी ZEE5 तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला !

मराठी ZEE5 तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला !

झी 5 मराठीवर लवकरच ” उत्तर” येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Mumbai: कायमच पुढे जाण्याच्या लगबगीत असलेल्या दुनियेला सातत्याने डावलल्या जाणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावणारे ‘उत्तर’ ! आपल्या शांत भावनिक प्रामाणिकपणाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला “उत्तर” 13 फेब्रुवारी रोजी मराठी ZEE5 वरील वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरद्वारे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे.
रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची आई लेकाची गोष्ट यातून उलगडणारी भावनिक कथा जिने चित्रपट गृहात प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं असा उत्तर हा सिनेमा आता झी 5 मराठी सारख्या ओटीटी मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल आहे. वेळ आपल्या हातातून निसटून जाताना जीवन अशी उत्तरं मागते जी देण्यास आपण तयार नसतो. संवेदनशीलता, संयम आणि अस्सल भावनिक स्पष्टतेसह उत्तर ची कथा अजून उलगडत जाते.
महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या मौनामुळे आकार घेतलेले एक कोमल, गुंतागुंतीचे आई-मुलाचे नाते उत्तर मध्ये अनुभवयाला मिळणार असून उमा ही एक आई जिची उबदार माया शांतपणे तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. निनाद हा एक तरुण घरापासून जवळजवळ नकळत दूर जात असताना जीवनात पुढे जात असताना, स्वतःचा संघर्ष बाजूला ठेवून परिस्थितीला दोष न देता भावनिक अंतर पार करण्याच्या कसरतीत दिसतो.


क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित आणि Zee स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, ‘उत्तर’ मध्ये रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी आहेत. तसेच ह्रुता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांची अदाकारी अधिकच भावनिक सखोलता जोडणारी आहे. परिस्थिती आई आणि मुलाच्या नात्याला एका वळणावर आणत असताना, प्रेम, क्षमा आणि त्यांची भावनिक गोष्ट यातून बघायला मिळणार आहे.
या चित्रपटाबद्दलचे आपले विचार मांडताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “उमाची व्यक्तिरेखा ही धैर्य, प्रेम आणि गोष्टी अखेरीस मार्गाला लागतील या अव्यक्त आशेवर आकार घेतलेले पात्र आहे. उमा साकारणे अतिशय भावूक करणारे होते. कारण तिच्या शांततेला शब्दांइतकाच आवाज होता. उत्तर आता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल म्हणून मी आभारी आहे. जिथे मनातील भावना अगदी जवळून अनुभवल्या जाऊ शकतील”.
अभिनय बेर्डे पुढे म्हणाला, “निनाद’ हा सतत पुढे जाणाऱ्या एका पिढीचे प्रतिनिधित्व करतो. अनेकदा आपण मागे काय सोडले याचे परीक्षण करण्याइतपत वेळ निनादकडे नसतो. मी निनाद वठवताना मला महत्त्वाकांक्षा, भावनिक अंतर आणि घराचे मनातून वाटणारे आकर्षण प्रतिबिंबित करण्यास मदत झाली. ‘उत्तर’ आता ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल याचा मला आनंद आहे”. दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी सांगितले की, “उत्तर हा नेहमीच आयुष्यासारखा वाटला. सौम्य, निराकरण न झालेला आणि सखोल मानवी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, या उक्तीवर विश्वास ठेवून जे अमूल्य क्षण आपण पुढे ढकलतो त्या क्षणांबद्दल आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरमुळे प्रेक्षकांना स्वत:च्या सोयीने या भावनिक गाभ्याचा वेध घेण्याची मुभा मिळते. ही कलाकृती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल आणि मनात बराच काळ रेंगाळेल”
13 फेब्रुवारी ला बघायला विसरू नका उत्तर फक्त झी 5 मराठी वर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

ULLU in talks to sell OTT platform to International Buyer

Print 🖨 PDF 📄 eBook 📱ULLU in Advance Talks to Sell OTT Platform with Content Library & Digital Infrastructure to an International Buyer Mumbai: ULLU, the homegrown OTT platform known for its bold and edgy content, is reportedly in advanced discussions to sell its entire streaming service, including its content library, intellectual property, and digital […]

मुंबई साइबर सेल के फोन से शुरू हुई ‘प्रीतम और पेड्रो’ की कहानी, राजकुमार हिरानी ने किया खुलासा

Print 🖨 PDF 📄 eBook 📱मुंबई साइबर सेल के फोन से शुरू हुई ‘प्रीतम और पेड्रो’ की कहानी, राजकुमार हिरानी ने किया खुलासा Mumbai: मशहूर फिल्ममेकर राजकुमार हिरानी अपनी पहली वेब सीरीज़ प्रीतम और पेड्रो लेकर आ रहे हैं। यह एक मजेदार सीरीज़ है, जिससे उनके बेटे वीर हिरानी भी एक्टिंग की दुनिया में कदम […]