manwa naik gauri kalelkar chaudhary together new marathi film

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

Mumbai: सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत, गणरायाच्या चरणी त्यांनी आपल्या आगामी कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण त्यांच्या नव्या प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे.
‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखालील ह्या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून मनवा हिने आजवर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. ‘पोर बाजार’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘सरस्वती’ या मालिकांची तसेच वेबसिरीजची निर्मिती केली आहे. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटात तसेच हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटासोबत ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली आहे. या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.”ही नवीन कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी बातमी ठरणार आहे!

×
Date : 10 February 2026 Posted By : EDITOR
नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
News Image

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

Mumbai: सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत, गणरायाच्या चरणी त्यांनी आपल्या आगामी कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण त्यांच्या नव्या प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे.
‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखालील ह्या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून मनवा हिने आजवर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. 'पोर बाजार' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन, 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'सरस्वती' या मालिकांची तसेच वेबसिरीजची निर्मिती केली आहे. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब', ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटात तसेच हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटासोबत ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली आहे. या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.”ही नवीन कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी बातमी ठरणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Namit Malhotra’s Ramayana Unveils Rakul Preet Singh as Surpanakha; Meet the Princess of Janasthan

📰 Generate e-Paper Clip Namit Malhotra’s Ramayana Unveils Rakul Preet Singh as Surpanakha; Meet the Princess of Janasthan The makers of Namit Malhotra’s Ramayana have unveiled Rakul Preet Singh’s first look as Surpanakha, introducing another key character from the epic as the film continues to reveal its grand cinematic world. Sharing the poster with the […]

MADDOCK FILMS AND KATHPUTLI CREATIONS UNVEIL THE GRAND TRAILER OF EETHA, STARRING SHRADDHA KAPOOR AS THE LEGENDARY EETHA BAI

📰 Generate e-Paper Clip MADDOCK FILMS AND KATHPUTLI CREATIONS UNVEIL THE GRAND TRAILER OF EETHA, STARRING SHRADDHA KAPOOR AS THE LEGENDARY EETHA BAI The epic musical drama tells the story of an artist who defied all odds to become a legend, promising a spectacular big-screen experience Mumbai : Some stories are told. Some are lived. […]