jabrat is a delightful marathi film produced and directed

‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट – निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे

Mumbai: मनोरंजनाबरोबरच सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी निर्माते-दिग्दर्शक सातत्याने प्रेक्षकांसमोर आणत असतात. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी निर्मात्या-दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकत ‘जब्राट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. परदेशात वास्तव्यास असूनही मराठी भाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जब्राट’ हा चित्रपट आजच्या तरुणाईची कथा मांडतो. बेधुंदपणे जगत असताना समोर उभ्या असणाऱ्या प्रश्नांना तितक्याच सक्षमपणे सामोरं जाणाऱ्या तरुणाईचा दृष्टिकोन या चित्रपटात पहायला मिळतो. ‘जब्राट’ संगीतमय आणि रंगतदार चित्रपट असून मैत्रीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी सशक्त कथा यात मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शिका प्रगती कोळगे सांगतात की, ‘तुम्ही जर उत्तम देण्याचा प्रयत्न केलात तर त्याला प्रतिसाद ही उत्तमच मिळतो. या विश्वासानेच ‘पल्याडवासी’ या चित्रपटानंतर ‘जब्राट’ माझा हा सिनेनिर्मितीचा दुसरा प्रयत्न आहे. ‘जब्राट’ चे कथानक सादर करण्यासाठी फ्रेश चेहऱ्यांची गरज होती. त्यामुळे ऑडिशन्सच्या माध्यमातून नवे चेहरे आम्ही आणले असून त्यांना अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकारांची साथ लाभली आहे. लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा मनोरंजनाचा भरपूर मसाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आजच्या काळात कसे जगायचे हे सांगणारा हा सिनेमा असल्याने प्रत्येकाने जरूर पाहावा असे आवाहनही प्रगती कोळगे यांनी केले आहे.
‘जब्राट’ चित्रपटात आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे या नव्या चेहऱ्यांसोबतच संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव या अनुभवी कलाकारांची मोठी फळी आहे. ‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर संगीताची जबाबदारी डॉ. जयभीम शिंदे यांनी सांभाळली आहे. सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी व त्यांना चांगलं काहीतरी देण्याच्या उद्देशाने मी हा वेगळा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास प्रगती कोळगे यांनी व्यक्त केला.

×
Date : 11 February 2026 Posted By : EDITOR
‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट – निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे
News Image

‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट - निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Veer Pahariya Joins Philanthropist Hussain Mansuri for On-Ground Relief Efforts in Flood-Hit Bihar

📰 Generate e-Paper Clip Veer Pahariya Joins Philanthropist Hussain Mansuri for On-Ground Relief Efforts in Flood-Hit Bihar Mumbai: Actor Veer Pahariya joined Mumbai-based philanthropist and social worker Hussain Mansuri in Patna to extend support to families affected by the devastating floods in Bihar. Veer extended financial assistance towards the relief initiative and personally distributed food, […]

Oscars2027: ऑस्कर 2027 में भारत: मराठी फिल्म ‘गोंधल’ ने रचा इतिहास

📰 Generate e-Paper Clip Oscars2027: ऑस्कर 2027 में भारत: मराठी फिल्म ‘गोंधल’ ने रचा इतिहास UNN: 33 बड़ी फिल्मों को पछाड़कर मराठी फिल्म ‘गोंधल’ बनी 99th Academy Awards में भारत की Official Entry! फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ने इसे कल चुना। इस रेस में ‘धुरंधर’, ‘Border 2’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘120 बहादुर’, ‘हक’ जैसी फिल्में […]