Prestigious Inca Awards 15th and 16th April Rosy Mumbai

प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत

Mumbai: इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.
भारतामधील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच आहे. भाषाभेद, प्रांतिक सीमारेषेच्या चौकटी ओलांडून, भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचा एकत्रित व समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) आणि साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) संबंधित उपक्रमांचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारली असून, या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India) हे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि जागतिक स्तरावरील अकॅडमींच्या तोडीचा दर्जा प्राप्त झाला आहे. पहिल्या ‘इंका अवॉर्ड्स’चे प्रस्तुत प्रायोजक म्हणून कल्याण ज्वेलर्स सहभागी झाले आहेत. उत्कृष्टता, परंपरा आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित ही भागीदारी ‘इंका’च्या भव्यतेला अधिक बळ देणारी ठरणार आहे.
‘इंका’ची रचना अकॅडमी-शैलीतील सन्मान प्रणालीवर आधारित असून, पारदर्शकता, तज्ज्ञांकडून मान्यता (Peer Recognition) आणि विश्वसनीयता हा याचा गाभा आहे. १२ भारतीय भाषांतील प्रत्येक चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या प्रमुख पुरस्कारांचा समावेश असेल. तसेच दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तांत्रिक कौशल्य आणि पदार्पण अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील (All-India) पुरस्कारांद्वारे प्रांतिक अभिमान आणि राष्ट्रीय उत्कृष्टतेचा सन्मान केला जाईल.
२०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांसाठी ‘इंका’तर्फे निर्माते आणि दिग्दर्शकांना अधिकृत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
• पात्रता: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रदर्शित मराठी चित्रपट

• अंतिम दिनांक: १ मार्च २०२६

• नोंदणी संकेतस्थळ: www.INCA.in
‘इंका’ हा केवळ पुरस्कार सोहळा नाही; तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकात्मिक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

×
Date : 21 February 2026 Posted By : EDITOR
प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Anjali Phougat to celebrate the strength of acid attack survivors through her LA Fashion Week showcase

📰 Generate e-Paper Clip Anjali Phougat to celebrate the strength of acid attack survivors through her LA Fashion Week showcase Mumbai: Designer Anjali Phougat dedicated her Los Angeles Fashion Week collection to acid attack survivors, using the philosophy of Japanese kintsugi to challenge conventional ideas of beauty and perfection. Explaining the intention behind the collection, […]

प्राइम वीडियो की ‘चार यार’ का ट्रेलर रिलीज, 2000 के दशक के मुंबई में दिखेगी क्राइम और दोस्ती की अनोखी कहानी

📰 Generate e-Paper Clip प्राइम वीडियो की ‘चार यार’ का ट्रेलर रिलीज, 2000 के दशक के मुंबई में दिखेगी क्राइम और दोस्ती की अनोखी कहानी हाई स्पीड चेज़, लूट और पक्की दोस्ती की कहानी ‘चार यार’ का ट्रेलर प्राइम वीडियो ने किया रिलीज Mumbai: एक्सक्लूसिव ओरिजिनल्स के लिए मशहूर वाली भारत की सबसे बड़ी स्ट्रीमिंग […]