The grand opening of Punyaat Red FM Marathi Film Festival

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

पहिल्याच दिवशी रसिकांची प्रचंड गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी, ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’ च्या ६ व्या पर्वाचा आज सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला. २२ ते २४ मे २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकर रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांचा अफाट उत्साह आणि मिळालेला हाऊसफुल प्रतिसाद पाहता, हा वीकेंड चित्रपटप्रेमींसाठी एक मोठी धमाल ठरणार यात शंका नाही! महोत्सवाचे उद्घाटन आणि उद्घाटनाची संध्याकाळ अत्यंत दिमाखदार ठरली. मराठी चित्रपटांच्या समृद्ध परंपरेचा सन्मान करत, उद्घाटन सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा आणि दिग्गज कलावंतांचा ‘प्राईड ऑफ मराठी सिनेमा’ या मानाच्या किताबाने गौरव करण्यात आला.
यामध्ये दिग्गज अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा गौरव विशेष ठरला. त्यांना मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आले. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर प्रतिभावंतांनाही ‘प्राईड ऑफ मराठी सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यांची यादी खालीलप्रमाणे:
* आशिष बेंडे (‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी)
* सुजय डहाके (‘श्यामची आई’ चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी)
* सुधाकर रेड्डी यक्कंती (‘नाळ २’ चित्रपटाच्या अप्रतिम छायांकन आणि दिग्दर्शनासाठी)
* त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (‘नाळ २’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी बालकलाकार कंपनी म्हणून विशेष सन्मान)
* कबीर खंदारे (‘जिप्सी’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी), आणि दशावतार (अनोख्या सिनेमॅटिक सादरीकरणासाठी आणि लोककलेच्या सन्मानासाठी).
तसेच या सोहळ्यात सिद्धार्थ जाधव यांना ‘पॉवरहाउस परफॉर्मर ऑफ द इयर’ अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल आणि गिरिजा ओक यांना ‘मराठी दिवा ऑफ द इयर’ सौंदर्य आणि कसदार अभिनयासाठी हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
‘मॅगझिन’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगने झाली सुरुवात!
पुरस्कार सोहळ्यानंतर महोत्सवाचा ओपेनिंग चित्रपट ‘मॅगझिन’ चा प्रीमियर दाखवण्यात आला. तरुण दिग्दर्शक शुभम शेवडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पहिल्याच दिवशी थिएटर पूर्णपणे हाऊसफुल होते आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.
हा महोत्सव २४ मे पर्यंत चालणार असून, पुढील दोन दिवसांत दर्जेदार मराठी चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुणेकर प्रेक्षकांना आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना जवळून अनुभवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, हा फेस्टिव्हल सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, अनेक सेलिब्रिटींना भेटण्याची आणि एका सिनेमॅटिक वीकेंडचा भरभरून आनंद घेण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत आहे. ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स, युनिव्हर्सिटी रोड येथे सुरू असलेला हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.

×
Date : 24 May 2026 Posted By : EDITOR
पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

अहान शेट्टी की एक्शन ड्रामा फिल्म ‘सनकी’ की शूटिंग 30 अक्टूबर से शुरू होगी

📰 Generate e-Paper Clip अहान शेट्टी की एक्शन ड्रामा फिल्म ‘सनकी’ की शूटिंग 30 अक्टूबर से शुरू होगी। Mumbai: ‘बॉर्डर 2’ की सफलता के बाद अहान शेट्टी एक बार फिर एक्शन करते नजर आएंगे। वह अपनी अगली फिल्म ‘सनकी’ की शूटिंग शुरू करने जा रहे हैं। इस फिल्म का निर्देशन टीनू सुरेश देसाई कर रहे […]

क्या 2 नवंबर को मिलेगा बड़ा सरप्राइज? सिद्धार्थ आनंद के ट्वीट के बाद फैंस के बीच तेज हुई अटकलें

📰 Generate e-Paper Clip क्या 2 नवंबर को मिलेगा बड़ा सरप्राइज? सिद्धार्थ आनंद के ट्वीट के बाद फैंस के बीच तेज हुई अटकलें सिद्धार्थ आनंद के एक शब्द ने बढ़ाई उत्सुकता, शाहरुख खान के फैंस को है सरप्राइज की उम्मीद? Mumbai: शाहरुख खान का जन्मदिन करीब है और ऐसे में सिद्धार्थ आनंद ने एक शब्द […]