Bhushan Pradhan's research for Swapnasundari begins

‘स्वप्नसुंदरी’साठी भूषण प्रधानचा शोध सुरु ! ‘शोधू कुठे नवरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्वप्नसुंदरी’साठी भूषण प्रधानचा शोध सुरु ! ‘शोधू कुठे नवरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि टीझरची झलक पाहाता भूषण प्रधान आपल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात असल्याचे स्पष्ट झाले. आता या शोधाला संगीताची साथ लाभली असून चित्रपटातील ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. योग्य जोडीदाराच्या शोधातील गंमत, गोंधळ आणि त्यामागची स्वप्नं हलक्याफुलक्या अंदाजात मांडणारं हे गाणं आहे. या गाण्याला लोकप्रिय गायक कुणाल गांजावाला यांच्या आवाजाची जादू लाभली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने हिंदी, मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या कुणाल गांजावाला यांनी या गाण्यातही वेगळी ऊर्जा आणली आहे. प्रशांत मडपुवार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर अंकुश बोरडकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. हलकाफुलका अंदाज, आकर्षक शब्दरचना आणि गाण्यातील मजेशीर मांडणी यामुळे ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणे तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावत आहे. दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणतात,“ ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट जसा एका स्वप्नातील व्यक्तीच्या शोधाची गोष्ट सांगतो, तसंच ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणं त्या शोधातील मजेशीर प्रवास उलगडतं. प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही ना काही कल्पना असतात आणि त्या भावना या गाण्यात अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत. कुणाल गांजावाला यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”
रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, सतीश महादेव गेजगे निर्मित व अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा लग्नसंस्था, नात्यांमधील गुंतागुंत आणि आपल्या स्वप्नातील जोडीदाराच्या शोधाची मनोरंजक कथा मांडणारा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथा आणि पटकथा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनीच केली असून दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

राम मंदिर में चढ़ावा चोरी प्रकरण-सीसीटीवी फुटेज से छेड़छाड़ के सबूत मिले

Print 🖨 PDF 📄 eBook 📱राम मंदिर में चढ़ावा चोरी प्रकरण-सीसीटीवी फुटेज से छेड़छाड़ के सबूत मिले अयोध्या (अयोध्या)। राम मंदिर दानराशि में गड़बड़ी की जांच लगातार तेजी पकड़ रही है। एसआईटी ने लगातार चौथे दिन भी संदिग्ध लोगों से पूछताछ की। गुरुवार को राम मंदिर के मुख्य ट्रस्टी डॉ. अनिल मिश्र से चार घण्टे […]