tumbadchi manjula blockbuster film

ब्लॉकबस्टर तुंबाडची मंजुळा ! दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार !

ब्लॉकबस्टर तुंबाडची मंजुळा ! दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार !

Mumbai: ती आली , तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे ‘तुंबाडची मंजुळा’. झी स्टुडिओजची निर्मिती, विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत,
निसर्गसंपन्न कोकणाचे दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा १५ कोटींचा टप्पा पार केला आहे. मुंबई पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रभर झळकणारे हाऊसफुलचे बोर्ड, समीक्षकांकडून मिळालेली पसंतीची पावती, प्रेक्षकांकडून येणाऱ्या कौतुकाच्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकापासून ते इन्फ्लुएन्सर्समध्ये निर्माण झालेली क्रेझ यातूनच चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाची प्रचिती येत आहे.
चित्रपटाला सर्वत्र मिळणारा तुफान प्रतिसाद बघता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम सध्या विविध शहरांत चित्रपटगृहांना भेटी देत आहेत. यावेळी “हा चित्रपट आम्हाला खूप भावलाय”, “आम्ही खूप दिवसांनी खळखळून हसलो”, “संपूर्ण कुटुंबासह आनंद घेण्यासारखा चित्रपट आहे”, “चांगला सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे” अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला येणारेही अनेक प्रेक्षक होते. “एकदा बघून मन भरत नाही म्हणून पुन्हा एकदा बघायला आलो” अशा भावना ते व्यक्त करत आहेत.
चित्रपटाला मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख तथा निर्माते बवेश जानवलेकर म्हणतात की,” २०२६ हे वर्ष झी स्टुडिओजसाठी अत्यंत यशदायी आणि आशादायी ठरलेलं आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई’ आणि ‘सुपर डुपर’ या झी स्टुडिओजच्या चित्रपटांना रसिक प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. यशाच्या याच प्रवासात ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपटसुद्धा सामिल झाला असून पहिल्या दोन आठवड्यात या चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद हा मनाला आनंद देणाराच आहे. कोणताही चित्रपट जेव्हा चालतो तेव्हा त्यासोबतीने मनोरंजन इंडस्ट्री अधिक मजबुत बनत जाते. चित्रपटव्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यासाठी हे यश अत्यंत महत्त्वाचं आहे. तुंबाडची मंजुळा चित्रपटाचं यश हे केवळ कमाईच्या आकड्यांवरती मोजण्यासारखं नाहीये कारण या चित्रपटाचा परीणाम हा त्याहीपुढचा आहे. यानिमित्ताने समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेस आला आहे हे विशेष. थिएटरमध्ये जाणारा प्रेक्षक जेवढा खळखळून हसतोय तेवढाच अंतर्मुख होऊन बाहेर पडतोय आणि हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.”
जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अंशुमन विचारे, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी आणि सहकलाकारांमध्ये योगेश शिरसाट, शार्दुल सराफ, उमेश जगताप, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, अथर्व रुके, प्रियल नाईक, वर्षा दांदळे यांच्या अभिनयाने सजलेला झी स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘ तुंबाडची मंजुळा ‘ सर्वांनी बघावा असे आवाहन टीमकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Selvi, led and produced by National Award-winning Anjali Patil, is set for its World premiere at the 31st Busan International Film Festival, exploring the rarely seen world of home-care workers

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Selvi, led and produced by National Award-winning Anjali Patil, is set for its World premiere at the 31st Busan International Film Festival, exploring the rarely seen world of home-care workers CHENNAI, INDIA / BUSAN, SOUTH KOREA —Selvi, the debut feature by Tamil writer-director Sailesh Rathnakumar, starring and produced by Anjali […]

अक्षय कुमार और विपुल अमृतलाल शाह की बड़े पैमाने पर बन रही एलियन एक्शन थ्रिलर ‘समुक’ की शूटिंग शुरू

Print 🖨 PDF 📄 eBook 📱अक्षय कुमार और विपुल अमृतलाल शाह की बड़े पैमाने पर बन रही एलियन एक्शन थ्रिलर ‘समुक’ की शूटिंग शुरू Mumbai: अक्षय कुमार अब एक ऐसी दुनिया में कदम रख रहे हैं, जहां वह इससे पहले कभी नजर नहीं आए हैं—एलियन की दुनिया। अभिनेता ने ‘समुक’ की शूटिंग शुरू कर दी […]