Seven friends fell in love with one Sarojini Bhootam Bhayam Chak

एका ‘सरोजिनी’वर फिदा झाले सात मित्र! ‘भूतम भयम्’चं भन्नाट गाणं प्रदर्शित

Mumbai: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा चित्रपट कथानक, कलाकार आणि गाण्यांमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं ‘सरोजिनी’ प्रदर्शित झालं असून, त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नृत्य, रंगतदार सादरीकरण आणि कॅची संगीत असलेलं हे गाणं चित्रपटाच्या मनोरंजनात आणखी भर घालणार आहे.
हे गाणं सात बेरोजगार मित्रांच्या भन्नाट गोष्टीला रंगतदार वळण देतं. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची स्वप्नं पाहाणाऱ्या या सात मित्रांची भेट सरोजिनीशी होते आणि तिच्या एका भेटीतच सगळे तिच्या प्रेमात पडतात. त्यानंतर सुरू होतो तिला इम्प्रेस करण्याचा प्रत्येकाचा वेगळा, मजेशीर आणि हटके प्रयत्न. जसराज जयंत जोशी यांच्या जबरदस्त आवाजतील या गाण्याला श्रीनाथ म्हात्रे यांचे धमाल संगीत लाभले आहे. तसेच प्राजक्त देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
गायक जसराज जयंत जोशी म्हणतात, ‘’ ‘सरोजिनी’ हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच त्यातली धमाल ऊर्जा आणि खट्याळपणा मला खूप आवडला. सात मित्रांची निरागस प्रेमकहाणी आणि त्यांची मजेशीर धडपड आवाजातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. गाण्याचा मूड, त्यातील विनोद आणि उत्साह कायम ठेवणं हे मोठं आव्हान होतं. रेकॉर्डिंगदरम्यान आम्ही खूप मजा केली आणि तीच ऊर्जा गाण्यात उतरली आहे. हे गाणं ऐकताना प्रेक्षकही नक्कीच गुणगुणतील आणि त्याचा मनमुराद आनंद घेतील, अशी मला खात्री आहे.’’ झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँग अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि शुभम जाधव यांच्यासह पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

×
Date : 03 August 2026 Posted By : EDITOR
एका ‘सरोजिनी’वर फिदा झाले सात मित्र! ‘भूतम भयम्’चं भन्नाट गाणं प्रदर्शित
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2

📰 Generate e-Paper Clip Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2 Showrun and produced by Soundarya Rajinikanth, and directed by Balaji Mohan, #Love stars Arjun Das and Aishwarya Lekshmi in a refreshing new pairing premiering on October 2. Fetching content Mumbai: Chemistry or compatibility – which one actually wins? That’s […]

Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’

📰 Generate e-Paper Clip Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’ Mumbai: Some love stories don’t come with an exit plan, and Veer Pahariya’s latest song rom Prem Keetanu, ‘Ishq Ka Ghulaam’, brings that bittersweet reality to the forefront. Crooned by B Praak, the song explores the […]