anibani marathi movie ott release waves prasar bharati

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

Mumbai: मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली हलकीफुलकी गोष्ट असलेला अरविंद जगताप लिखीत आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर हा चित्रपट प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
हा चित्रपट १८ डिसेंबर२०२५ रोजी ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रविण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनिल अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.
एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि त्यासोबत बापलेकाच्या नात्याची रंजक कथा लेखक अरविंद जगताप यांनी मिश्कीलपणे मांडली आहे. ही आणीबाणी कोणासाठी अडचणीची ठरणार ? आणि कोण यातून सहीसलामत बाहेर पडणार याची मनोरंजक कथा पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

संजय लीला भंसाली का बड़ा खुलासा: राज कपूर और गुरु दत्त की फिल्मों ने सिखाया महिलाओं को पर्दे पर सम्मान देना

Print 🖨 PDF 📄 eBook 📱संजय लीला भंसाली का बड़ा खुलासा: राज कपूर और गुरु दत्त की फिल्मों ने सिखाया महिलाओं को पर्दे पर सम्मान देना Mumbai: फिल्म निर्माता संजय लीला भंसाली ने एक बार फिर अपनी उस गहरी सोच को रेखांकित किया है जिसमें वह कहानी के केंद्र में महिलाओं को रखते हैं। भारतीय […]

बाकी सितारों से अलग है विजय देवरकोंडा-रश्मिका मंदाना की जोड़ी

Print 🖨 PDF 📄 eBook 📱बाकी सितारों से अलग है विजय देवरकोंडा-रश्मिका मंदाना की जोड़ी, शादी के जश्न के साथ-साथ दूसरों की खुशियों का भी रखा खास ख्याल Mumbai: एक ऐसे वर्ष में, जहां भव्य सेलिब्रिटी शादियों की भरमार रही, विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना का विवाह केवल अपनी भव्यता के लिए नहीं, बल्कि अपने […]