jhimma-3-movie-first-look-poster-release-shooting-begin

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!… झिम्मा ३’च्या चित्रीकरणाला सुरुवात

‘यावेळी तिसराच आहे!… झिम्मा ३’च्या चित्रीकरणाला सुरुवात

Mumbai: ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच ‘झिम्मा ३’ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता त्या उत्सुकतेत आणखी भर घालत चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून पोस्टरच्या माध्यमातून त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या पोस्टरमध्ये काही जण एका वर्तुळात उभे असल्याचे दिसतेय. मात्र, कुणाचाही चेहरा दाखवलेला नाही. त्याऐवजी प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे पेय दिसत आहे. कोणाच्या हातात कॉफी, कोणाकडे प्रोटीन शेक, कोणाकडे रंगीबेरंगी मॉकटेल, कोणाकडे नारळपाणी, तर कोणाच्या हातात आईस कॅन्डी आहे. प्रत्येकाची आवड आणि अंदाज वेगळा असल्याची झलक या पोस्टरमधून मिळते. एकाच फ्रेममध्ये दिसणारी ही रंगतदार मांडणी, समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण आणि प्रत्येकाच्या हातातील वेगळेपण यामुळे यावेळीही प्रेक्षकांना धमाल, मस्ती आणि भरपूर मनोरंजन अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत पोस्टर देत आहे. शिवाय जुन्या बायकांनी हे पोस्टर शेअर केल्यामुळे काहीतरी मोठं गुपित लवकरच समोर येणार हे नक्की.
पोस्टरवरील ‘यावेळी ‘तिसराच’ आहे!’ ही हटके टॅगलाईन विशेष लक्ष वेधून घेते. आणि सहलीला जायाचं हे संगीत देखील लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरमध्ये दिसणारे हात नेमके कोणाचे आहेत, यावेळी कोणते कलाकार या धमाल ट्रिपचा भाग असणार आणि ‘तिसराच’ या टॅगलाईनमागे नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. यासोबतच यावेळी ट्रीपचं ठिकाण नेमकं कुठलं आहे हे देखील कळलेलं नाही, पण भलतंच काहीतरी असणार हे नक्की.
याविषयी लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ‘’ ‘झिम्मा ३’ हा झिम्माचा फक्त पुढचा भाग नाही, तर आधीपेक्षा तीनपट मोठा, तीनपट भन्नाट आणि तीनपट मजेदार चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण टीम एका भन्नाट प्रवासाला निघाली आहे. या पोस्टरमधून आम्ही काही संकेत दिले आहेत, पण अजून खूप मोठे सरप्राईजेस बाकी आहेत. प्रेक्षकांनी जो काही विचार केला असेल, त्यापेक्षाही अधिक क्रेझी आणि वेडेपणाने भरलेलं काहीतरी आम्ही घेऊन येत आहोत. ‘झिम्मा ३’ची सारखी ट्रिप आजवर तुम्ही पाहिलेली नसेल. नवीन वर्षाची सुरुवातच एका अमेझिंग आणि धमाल ट्रिपने होणार आहे. जी पुन्हा एकदा आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रेमात पाडणार आहे आणि येणाऱ्या वर्षाची मनोरंजक सुरुवात करून देणार आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२७ रोजी ‘झिम्मा ३’सोबत थिएटरमध्ये नक्की भेटूया.’’
इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित असलेला ‘झिम्मा ३’ हा चित्रपट हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित असून क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. १ जानेवारी २०२७ रोजी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नव्या पोस्टरने त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

×
Date : 03 August 2026 Posted By : EDITOR
Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!… झिम्मा ३’च्या चित्रीकरणाला सुरुवात
News Image

'यावेळी तिसराच आहे!… झिम्मा ३’च्या चित्रीकरणाला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2

📰 Generate e-Paper Clip Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2 Showrun and produced by Soundarya Rajinikanth, and directed by Balaji Mohan, #Love stars Arjun Das and Aishwarya Lekshmi in a refreshing new pairing premiering on October 2. Fetching content Mumbai: Chemistry or compatibility – which one actually wins? That’s […]

Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’

📰 Generate e-Paper Clip Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’ Mumbai: Some love stories don’t come with an exit plan, and Veer Pahariya’s latest song rom Prem Keetanu, ‘Ishq Ka Ghulaam’, brings that bittersweet reality to the forefront. Crooned by B Praak, the song explores the […]