marathi-cinema/bhootam-bhayam movie-sarojini-song-releas

एका ‘सरोजिनी’वर फिदा झाले सात मित्र! ‘भूतम भयम्’चं भन्नाट गाणं प्रदर्शित

Mumbai: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा चित्रपट कथानक, कलाकार आणि गाण्यांमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं ‘सरोजिनी’ प्रदर्शित झालं असून, त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नृत्य, रंगतदार सादरीकरण आणि कॅची संगीत असलेलं हे गाणं चित्रपटाच्या मनोरंजनात आणखी भर घालणार आहे.
हे गाणं सात बेरोजगार मित्रांच्या भन्नाट गोष्टीला रंगतदार वळण देतं. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची स्वप्नं पाहाणाऱ्या या सात मित्रांची भेट सरोजिनीशी होते आणि तिच्या एका भेटीतच सगळे तिच्या प्रेमात पडतात. त्यानंतर सुरू होतो तिला इम्प्रेस करण्याचा प्रत्येकाचा वेगळा, मजेशीर आणि हटके प्रयत्न. जसराज जयंत जोशी यांच्या जबरदस्त आवाजतील या गाण्याला श्रीनाथ म्हात्रे यांचे धमाल संगीत लाभले आहे. तसेच प्राजक्त देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
गायक जसराज जयंत जोशी म्हणतात, ‘’ ‘सरोजिनी’ हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच त्यातली धमाल ऊर्जा आणि खट्याळपणा मला खूप आवडला. सात मित्रांची निरागस प्रेमकहाणी आणि त्यांची मजेशीर धडपड आवाजातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. गाण्याचा मूड, त्यातील विनोद आणि उत्साह कायम ठेवणं हे मोठं आव्हान होतं. रेकॉर्डिंगदरम्यान आम्ही खूप मजा केली आणि तीच ऊर्जा गाण्यात उतरली आहे. हे गाणं ऐकताना प्रेक्षकही नक्कीच गुणगुणतील आणि त्याचा मनमुराद आनंद घेतील, अशी मला खात्री आहे.’’
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँग अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि शुभम जाधव यांच्यासह पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

×
Date : 20 July 2026 Posted By : EDITOR
एका ‘सरोजिनी’वर फिदा झाले सात मित्र! ‘भूतम भयम्’चं भन्नाट गाणं प्रदर्शित
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Pooja Batra and Aditi Govitrikar join Deepak Tijori at the 5th National Yogasana Sports Championship 2026

📰 Generate e-Paper Clip Pooja Batra and Aditi Govitrikar join Deepak Tijori at the 5th National Yogasana Sports Championship 2026 Mumbai: The 5th National Yogasana Sports Championship 2026 brought together sport, wellness and the entertainment fraternity as actress Pooja Batra and actor-doctor Aditi Govitrikar joined actor Deepak Tijori at the prestigious event. The championship celebrated […]

High-stakes investigative thriller, starring Parineeti Chopra, ‘Reporting Live’ to release on 09 October, 2026

📰 Generate e-Paper Clip High-stakes investigative thriller, starring Parineeti Chopra, ‘Reporting Live’ to release on 09 October, 2026 Directed by Dhruv Tripathi, written by Mihir Jadhav and Dhruv Tripathi and produced by Partha Kiran Thakur and Joshua Shirsath, investigative thriller ‘Reporting Live’ will release on October 9, 2026 on Netflix Mumbai : A story worth […]