marathi-film-uut-honoured sri-lanka-international-film-festival

Marathi Film : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव

श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव

Mumbai: ‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे. ‘ऊत’ ला मिळत असलेला प्रतिसाद व विविध पुरस्कारांची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि निर्माते राज मिसाळ आवर्जून नमूद करतात.


व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच ‘ऊत’ मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे.
या वर्षाअखेर ‘ऊत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे .चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध महोत्सवांमध्ये दखल घेतलेला ‘ऊत’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच वेगळा प्रयत्न ठरेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Soundous Moufakir Reflects on Her Bond With Sonu Sood During Fateh, “He Reminded Me That Whatever Is Meant for You Will Find Its Way”

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Soundous Moufakir Reflects on Her Bond With Sonu Sood During Fateh, “He Reminded Me That Whatever Is Meant for You Will Find Its Way” Mumbai: Soundous Moufakir, actor and reality-show star known for her strong on-screen presence and evolving journey in Indian cinema, recently reflected on her experiences working with […]