rangkarmi cricket league trophy tshirt launch

मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार, ‘ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण

Mumbai: रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’चे सामने १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर रंगणार आहेत. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मध्ये ६ संघ असून त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले आहे. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’ संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच नुपूर दुधवडकर ‘मर्द मराठा’ संघाची धुरा सांभाळणार आहेत. हरीश दुधाडे ‘स्टार मराठा’ संघाचे नेतृत्व करणार असून कांचन पगारे ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे ‘मराठा वॉरियर’ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
राजकीय नेते श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. ‘कलाकारांमध्ये मैत्री आणि क्रीडाभावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी कलाकारांचा हा अनोखा क्रिकेट महोत्सव अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
१४ आणि १५ मे ला रंगणाऱ्या ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’च्या आयोजनामध्ये संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाची आकर्षक मांडणी करण्यात आली. यावेळी अधिकृत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले तसेच विशेष डिझाइन केलेल्या आकर्षक टी-शर्टचे सादरीकरणही करण्यात आले. लीगसाठी पंडित राठोड, सचिन खंडागळे, संदीप राठोड, ओमकार सर आणि अखिलेश चौबे,भरत नाना पाटील यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील मराठी कलाकारांना एकत्र आणून मैत्री आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा या लीगचा मुख्य उद्देश असल्याचे मंगेश सांगळे आणि संचित यादव यांनी सांगितले.

×
Date : 12 May 2026 Posted By : EDITOR
मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार, ‘ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

यूपी चुनाव के लिए कांग्रेस ने सपा से मांगी 181 सीटें, गठबंधन को लेकर 17 नवंबर को होगी दोनों पार्टियों की बैठक

📰 Generate e-Paper Clip यूपी चुनाव के लिए कांग्रेस ने सपा से मांगी 181 सीटें, गठबंधन को लेकर 17 नवंबर को होगी दोनों पार्टियों की बैठक लखनऊ। विधान सभा चुनाव के लिए गठबंधन में कांग्रेस द्वारा मांगी गई सीटाें की संख्या खुद सपा प्रमुख अखिलेश यादव ने बता दी है। उन्होंने दिल्ली में आयोजित एक […]

IND U19 vs PAK U19: ‘9वीं बार एशिया कप के हम सिकंदर

📰 Generate e-Paper Clip IND U19 vs PAK U19: ‘9वीं बार एशिया कप के हम सिकंदर’, सांस थाम देने वाले मैच में मोहित उल्वा ने पाकिस्तान के मुंह से छीनी जीत नई दिल्ली। मनल चौहान और मोहित उल्वा ने शनिवार को 8 विकेट गंवाने के बाद पाकिस्तान के जबड़े से जीत छीनकर भारत को रिकॉर्ड […]