Sushant Shelar is here with S.S.C.B.P.L.

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल

दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

Mumbai: कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर कधी कलाकार क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. क्रिकेट म्हटलं की, सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो. मग आपले मराठी सिनेसृष्टीतील कलाकार कसे मागे राहतील. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. पण शुटिंग, वेळेची कमतरता यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळत नाही हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी ‘एस एस सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ चे (SSCBCL) आयोजन यंदा थेट दुबईत केले आहे. ज्योती एन्टरटेन्मेन्टचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले आहे.
मनोरंजन क्षेत्रासह राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात देखील सक्रिय असणारे अभिनेता सुशांत शेलार कायमच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. कोविड काळ अथवा पूरपरिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात त्यांनी दिलाआहे. ‘शेलार मामा फाउंडेशन’ द्वारे ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजासाठी गरजूंना मदत करत आपलं सामाजिक भान जपलं आहे.
एसएससीबीसीएल(SSCBCL) मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कलाकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात काही संघ असतील. या संघामध्ये पुरुष कलाकारांसोबत महिला कलाकार, माध्यमकर्मी आणि इन्फ्लुएन्सर देखील सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून पर्यावरण, संस्कृती, गडकिल्ले यांचे स्मरण रहावे यासाठी टीमची नावे त्या अनुषंगाने दिली आहेत. रत्नदुर्ग-रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा-नागपूर, अजिंक्यतारा- सातारा, शिवनेरी -पुणे, पन्हाळा-कोल्हापूर, गोदावरी-नाशिक अशा काही टीमचा समावेश असणार आहे. एसएससीबीसीएल (SSCBCL) तसेच संघाच्या टीम मधील कलाकारांची घोषणा, लोगोचे अनावरण मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याचे या लीगचे सर्वेसर्वा अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले. अभिनेता सुशांत शेलार वेगवेगळ्या मनोरंजनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘एसएससीबीसीएल’(SSCBCL) चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

Print 🖨 PDF 📄 eBook 📱साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त Mumbai: श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ विश्वासावर आधारित पालखी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पालखी’ हा चित्रपट म्हणजे साईबाबांवरील अढळ श्रद्धा, पालखीची […]