salbardi-continues-to-thrill-at-the-box-office

दुसऱ्या आठवड्यातही ‘सालबर्डी’चा थरार कायम

Mumbai: गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळते आहे. रहस्यमय कथानक, अनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही ‘सालबर्डी’ची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही ‘सालबर्डी’ बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पदार्पणाबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं, ‘प्रेक्षकांनी ‘सालबर्डी’ला दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही मिळत असलेलं प्रेम आम्हाला उत्तम काम करण्याची प्रेरणा देत आहे.’
नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत सोबत शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांचा दमदार अभिनय पहायला मिळतो आहे.

×
Date : 28 April 2026 Posted By : EDITOR
दुसऱ्या आठवड्यातही ‘सालबर्डी’चा थरार कायम
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

महाष्टमी पर सौरव गांगुली के साथ उनके बचपन के दुर्गा पूजा पंडालों में जाएंगे राजकुमार राव

📰 Generate e-Paper Clip महाष्टमी पर सौरव गांगुली के साथ उनके बचपन के दुर्गा पूजा पंडालों में जाएंगे राजकुमार राव Mumbai: फिल्म की रिलीज से पहले महाष्टमी के खास मौके पर राजकुमार राव और इंडियन क्रिकेट टीम के पूर्व कप्तान सौरव गांगुली कोलकाता के उन्हीं पूजा पंडालों में जाएंगे, जहां गांगुली बचपन से जाते रहे […]

Reeloid Media Founder Rohit Guptaa Advocates for Microdrama and Creator Economy Policies at CII Big Picture Summit 2026

📰 Generate e-Paper Clip Reeloid Media Founder Rohit Guptaa Advocates for Microdrama and Creator Economy Policies at CII Big Picture Summit 2026 MUMBAI: At the CII Big Picture Summit 2026 in Mumbai, Rohit Guptaa, Founder and CEO of vertical microdrama platform Reeloid Media, raised key questions regarding policy support for the emerging microdrama industry and […]