mamachya govyala jauya movie marathi film viju mane

‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !

‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !

अंकुश चौधरीही होणार या गँगमध्ये सामील,३१ जुलैला चित्रपटगृहात पिकनिक !

गोवा:  प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ”यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!” हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विजू माने यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.
‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा मित्रांच्या जगात घेऊन जाणारा, हसवणारा आणि तितकाच रिलेट होणारा चित्रपट घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या गोवा ट्रिपमध्ये नेमकं कोण सहभागी असणार, याची उत्सुकता होती. अखेर या भन्नाट गँगचा खुलासा झाला असून कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर ही ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे या धमाल गँगमध्ये आता अंकुश चौधरीचीही एन्ट्री झाली असून त्यामुळे चित्रपटाची मजा आणखी रंगणार आहे.
नुकतंच या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. मराठीत अशा प्रकारचा भवदिव्य सोहळा पहिल्यांदाच रंगला झाला असून या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते उपस्थित होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमध्ये दिसणारी ऊर्जा, मस्ती आणि मित्रांच्या चेहऱ्यावरची बेफिकीर धमाल अक्षरशः गोवा ट्रिपची फीलिंग देऊन जाते. एका बाजूला बाईकवर वेड्यासारखी एन्जॉय करणारी गँग, हवेत उडणाऱ्या बाटल्या, कॅन्स, रंगीबेरंगी कन्फेटी आणि पार्श्वभूमीतील बीच वाईब… हे सगळं पाहाताना ही फक्त ट्रिप नाही, तर मैत्रीचा जल्लोष असणार आहे, हे स्पष्ट जाणवतं. पोस्टरमधील प्रत्येक कलाकाराचे एक्सप्रेशनच चित्रपटाच्या भन्नाट टोनची झलक देतो. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये दिसणारी बेधुंद ऊर्जा ही फक्त कॉमेडीपुरती मर्यादित नसून, प्रत्येक मित्रांच्या ग्रुपने अनुभवलेल्या त्या ‘गोवा प्लॅन’च्या आठवणींना छेडणारी आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील मित्रांना रिलेट होणार, अशी चर्चा आहे.
चित्रपटाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, ‘’या चित्रपटाची जितकी उत्सुकता प्रेक्षकांना आहे, तितकीच मलाही आहे. या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना दिलेली सर्वात अमूल्य गोष्ट म्हणजे निरागस, मनमोकळं हास्य. मी स्वतः मैत्री जपणारा माणूस आहे. मैत्री ही कोणत्याही चौकटीत न बसणारी भावना आहे. तिची भाषा ही फक्त मैत्रीचीच असते. त्या नात्याला कोणताही रंग, बंधन किंवा अट लागू शकत नाही. गेली दहा वर्षे या कलाकारांनी आणि टीमने मैत्रीचा जो सुंदर धागा जपला आहे, तोच आता पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कलाकारांविषयी बोलायचं झालं तर प्रत्येकाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. संपूर्ण चित्रपटाच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. प्रेक्षकांनी या मैत्रीचा, हास्याचा आणि भावनांचा प्रवास नक्की अनुभवावा.’’
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ”मैत्री, वेडेपणा, अचानक बनलेले प्लॅन्स आणि त्या ट्रिपमध्ये घडणारे भन्नाट अनुभव हे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतात. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा फक्त गोव्याला जाण्याचा प्रवास नाही, तर मित्रांसोबत जगलेल्या क्षणांचा खजिना आहे. प्रेक्षकांना थिएटरमध्ये बसून स्वतःच्या मित्रांची आणि त्यांच्या ट्रिप्सची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. फ्रेंडशिप, फन आणि फिल्म यांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळणार आहे.’’
फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मित्रांसाठी ही एक भन्नाट सिनेमॅटिक ट्रीट ठरणार आहे. मैत्री, धम्माल, नॉस्टॅल्जिया आणि गोव्याच्या मस्तीचा फुल्ल डोस देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक भन्नाट ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Namrata Lodaya Set To Represent India At Cannes 2026 With Self-Reflecting Performance Art Concept ‘The Inner Red Carpet’!

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Namrata Lodaya Set To Represent India At Cannes 2026 With Self-Reflecting Performance Art Concept ‘The Inner Red Carpet’! Namrata Lodaya Set To Represent India At Cannes 2026 With Self-Reflecting Performance Art Concept ‘The Inner Red Carpet’! Mumbai : based Self-Authenticity Facilitator and living minimalist performance artist Namrata Vishal Lodaya is […]

अदिति शर्मा और हम्द खान की “इश्क ज़ालिम है” वीनस म्यूजिक पर रिलीज !

Print 🖨 PDF 📄 eBook 📱अदिति शर्मा और हम्द खान की “इश्क ज़ालिम है” वीनस म्यूजिक पर रिलीज ! मुंबई: अदिति शर्मा और हम्द खान की जोड़ी ने अपने नए वीडियो एल्बम “इश्क ज़ालिम है” का आगाज़ किया है! बॉलीवुड गायक अंसारी मोहसिन द्वारा गाए, संगीतबद्ध और गीत लिखे गए इस वीडियो एल्बम आज वीनस […]