amchya pidichi goshtach vegli release on may 9th

तीन पिढ्यांचा क्रेझी प्रवास, ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ चा ९ मे रोजी शुभारंभ !

Mumbai: तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन … आणि एक्सप्रेशनच्या भन्नाट स्टाईल्स! सोशल मिडियावर प्रदर्शित झालेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकाच्या व्हिडिओने सध्या प्रेक्षकांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडिओमध्ये १९७०, १९९० आणि आजचे जेन झी या तिन्ही पिढ्या अगदी वेगळ्या अंदाजात स्वतःला व्यक्त करताना दिसत आहेत. कुठे साधेपणा, कुठे सटल इशारे, तर कुठे थेट डिजिटल मदत. प्रत्येक पिढीची स्वतःची वेगळी वाईब यात दिसतेय. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवंकोरं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगभूमीवर दाखल होणार असून, एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील मजेशीर प्रवास यानिमित्ताने उलगडणार आहे. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओने नाटकाबद्दलती उत्सुकता वाढवली आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची निर्मिती सोनल प्रोडक्शन्सची आहे. तर अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे नंदू कदम निर्माते आहेत.
एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांवर भाष्य करणारं हे नाटक कौटुंबिक असून हलक्याफुलक्या ढंगात खूप सुंदर विचार मांडणार आहे. हसत-खेळत नाट्यरसिकांना विचार करायला लावणारा हा अनुभव नक्कीच वेगळा ठरेल. एकूणच, पिढ्या बदलल्या तर स्टाईल बदलते… आणि हाच फरक ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ मध्ये मजेशीर पद्धतीने रंगणार आहे.

×
Date : 22 April 2026 Posted By : EDITOR
तीन पिढ्यांचा क्रेझी प्रवास, ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ चा ९ मे रोजी शुभारंभ !
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Dharma Production and Leo Media Collective join hands for a feature film on founder of R&AW – Rameshwar Nath Kao. Lock August 11, 2028 release date

📰 Generate e-Paper Clip Dharma Production and Leo Media Collective join hands for a feature film on founder of R&AW – Rameshwar Nath Kao. Lock August 11, 2028 release date Mumbai: After Kesari, Raazi, SherShah, and Kesari: Chapter 2, Karan Johar is all set to bring forward the story of another unsung legend to the […]

‘पहला प्यार दूसरी बार’ लेकर आया प्यार और दोस्ती की नई कहानी, ट्रेलर हुआ आउट

📰 Generate e-Paper Clip ‘पहला प्यार दूसरी बार’ लेकर आया प्यार और दोस्ती की नई कहानी, ट्रेलर हुआ आउट 23 अक्टूबर को सिनेमाघरों में आएगी ‘पहला प्यार दूसरी बार’, ट्रेलर में दिखी प्यार और दोस्ती की झलक Mumbai: ‘पहला प्यार दूसरी बार’ का मजेदार ट्रेलर रिलीज़ हो गया है, और यह फिल्म के अनोखे टाइटल […]