manjari-fadnis-and-music-director-abhijit-chandrakala-ekaki song

अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण!

अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण!

नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai: वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील ‘एकाकी’ हे हळवे आणि भावनिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला की, मन किती एकटे पडते, त्या एकाकीपणाची बोचरी जाणीव या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे. हळुवार संगीत, अर्थपूर्ण शब्द आणि भावनिक सादरीकरण यामुळे ‘एकाकी’ हे गाणे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करते.
या गाण्याला अभिजीत चंद्रकला यांनी संगीतबद्ध केले असून, शौनक नारळे (असर) यांनी या गाण्याचे हृदयस्पर्शी शब्द लिहिले आहेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने या गाण्याद्वारे गायनात पदार्पण केले आहे. अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी मंजिरी आता आपल्या सुरेल आवाजातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना दिसते. तिच्या आवाजातील कोमलता आणि भावनिकता गाण्याला एक वेगळीच उंची देते. तिच्यासोबत अभिजीत चंद्रकला यांनीही हे गाणे गायले असून, दोघांचेही या गाण्याच्या निमित्ताने गायनात पदार्पण झाले आहे. मंजिरीने हे गाणे अत्यंत सुंदरपणे गायले आहे तर संगीत दिग्दर्शक असूनही अभिजीत चंद्रकला यांनीही गायकीत तितक्याच प्रभावीपणे आपली छाप उमटवली आहे.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी ‘एकाकी’ हे गाणे प्रत्येकाच्या मनातल्या एकटेपणाला स्पर्श करते. आपल्या जवळची माणसे असूनही आपण कधी कधी किती दूर जातो, ही भावना या गाण्यातून प्रकर्षाने जाणवते.
आपल्या गायकीच्या पदार्पणाबद्दल मंजिरी फडणीस म्हणते, ”संगीत हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लहानपणापासूनच घरात संगीताची परंपरा असल्यामुळे स्टेजवर गाणं आणि नृत्य करत मोठी झाले. अभिनेत्री होण्याआधी ‘चॅनल व्ही पॉपस्टार्स’मध्येही सहभागी झाले होते. परंतु तिथे माझी निवड झाली नाही.अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू ठेवत २०१८ पासून मी गाण्याकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. लॉकडाउनदरम्यान सोशल मीडियावर शेअर केलेल्या गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढला. समीर आणि माझी पूर्वीपासूनची ओळख. आम्ही एकत्र जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे चित्रपटाबद्दल त्याने मला सांगितले आणि संधी दिली आणि आता माझे पहिले गाणे ‘बाप्या’ मधून भेटीला येत आहे.”
दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, ” ‘एकाकी’ हे गाणे नात्यांमधील न बोललेले भाव आणि मनात साचलेली पोकळी व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे गाणे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवी आणि वास्तव भावना उलगडणारे आहे. हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.”
समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी यांनी केली आहे. युवावर्गाच्या उर्जेने आणि वेगळ्या दृश्यशैलीने भरलेलं ‘कारट्या’ गाणं आधीच चर्चेत आलं असून, आता हे गाणंही संगीतप्रेमींना आपलंसं करेल. १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता या गाण्याने अधिकच वाढवली आहे. यात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, श्रीकांत यादव, देविका दफ्तरदार, आर्यन मेंगजी, गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

×
Date : 22 April 2026 Posted By : EDITOR
अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण!
News Image

अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण!

नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai: वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत 'बाप्या' या आगामी चित्रपटातील ‘एकाकी’ हे हळवे आणि भावनिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला की, मन किती एकटे पडते, त्या एकाकीपणाची बोचरी जाणीव या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे. हळुवार संगीत, अर्थपूर्ण शब्द आणि भावनिक सादरीकरण यामुळे 'एकाकी' हे गाणे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करते.
या गाण्याला अभिजीत चंद्रकला यांनी संगीतबद्ध केले असून, शौनक नारळे (असर) यांनी या गाण्याचे हृदयस्पर्शी शब्द लिहिले आहेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने या गाण्याद्वारे गायनात पदार्पण केले आहे. अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी मंजिरी आता आपल्या सुरेल आवाजातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना दिसते. तिच्या आवाजातील कोमलता आणि भावनिकता गाण्याला एक वेगळीच उंची देते. तिच्यासोबत अभिजीत चंद्रकला यांनीही हे गाणे गायले असून, दोघांचेही या गाण्याच्या निमित्ताने गायनात पदार्पण झाले आहे. मंजिरीने हे गाणे अत्यंत सुंदरपणे गायले आहे तर संगीत दिग्दर्शक असूनही अभिजीत चंद्रकला यांनीही गायकीत तितक्याच प्रभावीपणे आपली छाप उमटवली आहे.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी ‘एकाकी’ हे गाणे प्रत्येकाच्या मनातल्या एकटेपणाला स्पर्श करते. आपल्या जवळची माणसे असूनही आपण कधी कधी किती दूर जातो, ही भावना या गाण्यातून प्रकर्षाने जाणवते.
आपल्या गायकीच्या पदार्पणाबद्दल मंजिरी फडणीस म्हणते, ''संगीत हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लहानपणापासूनच घरात संगीताची परंपरा असल्यामुळे स्टेजवर गाणं आणि नृत्य करत मोठी झाले. अभिनेत्री होण्याआधी ‘चॅनल व्ही पॉपस्टार्स’मध्येही सहभागी झाले होते. परंतु तिथे माझी निवड झाली नाही.अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू ठेवत २०१८ पासून मी गाण्याकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. लॉकडाउनदरम्यान सोशल मीडियावर शेअर केलेल्या गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढला. समीर आणि माझी पूर्वीपासूनची ओळख. आम्ही एकत्र जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे चित्रपटाबद्दल त्याने मला सांगितले आणि संधी दिली आणि आता माझे पहिले गाणे 'बाप्या' मधून भेटीला येत आहे.''
दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, '' 'एकाकी' हे गाणे नात्यांमधील न बोललेले भाव आणि मनात साचलेली पोकळी व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे गाणे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवी आणि वास्तव भावना उलगडणारे आहे. हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.”
समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी यांनी केली आहे. युवावर्गाच्या उर्जेने आणि वेगळ्या दृश्यशैलीने भरलेलं ‘कारट्या’ गाणं आधीच चर्चेत आलं असून, आता हे गाणंही संगीतप्रेमींना आपलंसं करेल. १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता या गाण्याने अधिकच वाढवली आहे. यात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, श्रीकांत यादव, देविका दफ्तरदार, आर्यन मेंगजी, गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Dharma Production and Leo Media Collective join hands for a feature film on founder of R&AW – Rameshwar Nath Kao. Lock August 11, 2028 release date

📰 Generate e-Paper Clip Dharma Production and Leo Media Collective join hands for a feature film on founder of R&AW – Rameshwar Nath Kao. Lock August 11, 2028 release date Mumbai: After Kesari, Raazi, SherShah, and Kesari: Chapter 2, Karan Johar is all set to bring forward the story of another unsung legend to the […]

‘पहला प्यार दूसरी बार’ लेकर आया प्यार और दोस्ती की नई कहानी, ट्रेलर हुआ आउट

📰 Generate e-Paper Clip ‘पहला प्यार दूसरी बार’ लेकर आया प्यार और दोस्ती की नई कहानी, ट्रेलर हुआ आउट 23 अक्टूबर को सिनेमाघरों में आएगी ‘पहला प्यार दूसरी बार’, ट्रेलर में दिखी प्यार और दोस्ती की झलक Mumbai: ‘पहला प्यार दूसरी बार’ का मजेदार ट्रेलर रिलीज़ हो गया है, और यह फिल्म के अनोखे टाइटल […]