Bhootam Bhayam grand glimpse of horror-comedy teaser increase

‘भूतम भयम्’’च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विनोद, रहस्य, थरार आणि भव्य दृश्यरचना यांचा संगम असलेल्या या टीझरने प्रेक्षकांना चित्रपटाच्या अनोख्या विश्वाची झलक दिली आहे.

टीझरमध्ये रहस्यमय घटनांमध्ये अडकलेल्या सात मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. विनोदाची अचूक पेरणी, थरारक वातावरण आणि कलाकारांची भन्नाट ऊर्जा यामुळे टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आपल्या वेगळ्या शैलीमुळे लोकप्रिय ठरलेली ‘ऑरेंज ज्यूस गँग’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांचा हटके अंदाज टीझरमधून पाहायला मिळतो. त्यांच्या पात्रांभोवतीचं रहस्य कायम ठेवण्यात आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

टीझरमधील भव्य दृश्यरचना, दर्जेदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा सिनेमॅटिक स्केल विशेष लक्ष वेधून घेतो. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी ही भव्यता प्रेक्षकांना एका वेगळ्या मनोरंजनविश्वात घेऊन जाण्याचं आश्वासन देते.दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “टीझर हा आमच्या चित्रपटाच्या विश्वाची फक्त एक छोटीशी झलक आहे. ‘भूतम भयम्’मध्ये विनोद आणि भय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर हा अनुभव आणखी रोमांचक असेल.”

निर्माते नरेन कुमार म्हणतात, “मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीझरमधून त्या मेहनतीची झलक दिसते आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे.”निर्माते महेश ज्ञानदेव कोरडे म्हणतात, “मराठी प्रेक्षकांना तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि वेगळा आशय अनुभवायला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘भूतम भयम्’चं जग जितकं रहस्यमय आहे, तितकंच ते मनोरंजकही आहे.”झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख भावेश जानवलेकर म्हणाले, “टीझरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा ताजातवाना अंदाज, नव्या पिढीची ऊर्जा आणि भव्य सादरीकरण यामुळे ‘भूतम भयम्’ प्रेक्षकांसाठी एक खास सिनेमॅटिक मेजवानी ठरणार आहे.”झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्माते आहेत, तर बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. हॉरर, कॉमेडी आणि भव्य मनोरंजनाचा तिहेरी डोस घेऊन येणारा हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, टीझरनंतर आता प्रेक्षकांना ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे.

×
Date : 17 June 2026 Posted By : EDITOR
‘भूतम भयम्’’च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!
News Image

'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विनोद, रहस्य, थरार आणि भव्य दृश्यरचना यांचा संगम असलेल्या या टीझरने प्रेक्षकांना चित्रपटाच्या अनोख्या विश्वाची झलक दिली आहे.

टीझरमध्ये रहस्यमय घटनांमध्ये अडकलेल्या सात मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. विनोदाची अचूक पेरणी, थरारक वातावरण आणि कलाकारांची भन्नाट ऊर्जा यामुळे टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आपल्या वेगळ्या शैलीमुळे लोकप्रिय ठरलेली ‘ऑरेंज ज्यूस गँग’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांचा हटके अंदाज टीझरमधून पाहायला मिळतो. त्यांच्या पात्रांभोवतीचं रहस्य कायम ठेवण्यात आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

टीझरमधील भव्य दृश्यरचना, दर्जेदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा सिनेमॅटिक स्केल विशेष लक्ष वेधून घेतो. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी ही भव्यता प्रेक्षकांना एका वेगळ्या मनोरंजनविश्वात घेऊन जाण्याचं आश्वासन देते.दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “टीझर हा आमच्या चित्रपटाच्या विश्वाची फक्त एक छोटीशी झलक आहे. ‘भूतम भयम्’मध्ये विनोद आणि भय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर हा अनुभव आणखी रोमांचक असेल.”

निर्माते नरेन कुमार म्हणतात, “मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीझरमधून त्या मेहनतीची झलक दिसते आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे.”निर्माते महेश ज्ञानदेव कोरडे म्हणतात, “मराठी प्रेक्षकांना तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि वेगळा आशय अनुभवायला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘भूतम भयम्’चं जग जितकं रहस्यमय आहे, तितकंच ते मनोरंजकही आहे.”झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख भावेश जानवलेकर म्हणाले, “टीझरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा ताजातवाना अंदाज, नव्या पिढीची ऊर्जा आणि भव्य सादरीकरण यामुळे ‘भूतम भयम्’ प्रेक्षकांसाठी एक खास सिनेमॅटिक मेजवानी ठरणार आहे.”झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्माते आहेत, तर बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. हॉरर, कॉमेडी आणि भव्य मनोरंजनाचा तिहेरी डोस घेऊन येणारा हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, टीझरनंतर आता प्रेक्षकांना ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2

📰 Generate e-Paper Clip Chemistry or Compatibility? ‘#Love’ Bets It All, Only on Netflix October 2 Showrun and produced by Soundarya Rajinikanth, and directed by Balaji Mohan, #Love stars Arjun Das and Aishwarya Lekshmi in a refreshing new pairing premiering on October 2. Fetching content Mumbai: Chemistry or compatibility – which one actually wins? That’s […]

Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’

📰 Generate e-Paper Clip Veer Pahariya’s ‘Ishq Ka Ghulaam’ Captures the Pain of Love and Heartbreak in ‘Prem Keetanu’ Mumbai: Some love stories don’t come with an exit plan, and Veer Pahariya’s latest song rom Prem Keetanu, ‘Ishq Ka Ghulaam’, brings that bittersweet reality to the forefront. Crooned by B Praak, the song explores the […]