bol-bol-rani-marathi-movie-teaser

अपहरण, रहस्य आणि सस्पेन्सचा खेळ!

अपहरण, रहस्य आणि सस्पेन्सचा खेळ!

‘बोल बोल राणी’ची पहिली झलक प्रेक्षकांना खिळवणारी

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली थरारक झलक समोर आली असून, यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. टीझरमध्ये अनुभवता येणारे चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत यामुळे रहस्याचे वातावरण अधिक गडद होत असल्याचे जाणवते, तर पडद्यावरील ॲक्शन सिक्वेन्स पाहाता हा चित्रपट रहस्य, थ्रिलने पुरेपुर भरलेला आहे. या चित्रपटातील संवाद हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून त्यामुळे रहस्याची खोली अधिकच वाढते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवेल यात शंका नाही.
या चित्रपटाच्या पडद्यामागे एक भक्कम टीम लाभली असून सिड विंचुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते म्हणतात, “ ‘बोल बोल राणी’ हा केवळ एक सस्पेन्स चित्रपट नसून मानवी स्वभावाचे आणि नातेसंबंधांचे अनेक पदर उलगडणारा एक थ्रिलर आहे. आजचा प्रेक्षक सुजाण आहे, त्याला पडद्यावर काहीतरी वेगळं आणि खिळवून ठेवणारं हवं असतं. या चित्रपटाची कथा आणि त्यातील प्रत्येक पात्राचा संघर्ष प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे, मुख्य चित्रपटात प्रेक्षकांसाठी रहस्याचा एक मोठा खजिना दडला आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडेल.”
अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर, अमित भानुशाली हे निर्माते आहेत तर यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर हिच्यासह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे हे मुख्य भूमिकेत आहेत.

×
Date : 17 June 2026 Posted By : EDITOR
अपहरण, रहस्य आणि सस्पेन्सचा खेळ!
News Image

अपहरण, रहस्य आणि सस्पेन्सचा खेळ!

'बोल बोल राणी'ची पहिली झलक प्रेक्षकांना खिळवणारी

Mumbai: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड' निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बोल बोल राणी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली थरारक झलक समोर आली असून, यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. टीझरमध्ये अनुभवता येणारे चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत यामुळे रहस्याचे वातावरण अधिक गडद होत असल्याचे जाणवते, तर पडद्यावरील ॲक्शन सिक्वेन्स पाहाता हा चित्रपट रहस्य, थ्रिलने पुरेपुर भरलेला आहे. या चित्रपटातील संवाद हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून त्यामुळे रहस्याची खोली अधिकच वाढते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवेल यात शंका नाही.
या चित्रपटाच्या पडद्यामागे एक भक्कम टीम लाभली असून सिड विंचुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते म्हणतात, “ ‘बोल बोल राणी’ हा केवळ एक सस्पेन्स चित्रपट नसून मानवी स्वभावाचे आणि नातेसंबंधांचे अनेक पदर उलगडणारा एक थ्रिलर आहे. आजचा प्रेक्षक सुजाण आहे, त्याला पडद्यावर काहीतरी वेगळं आणि खिळवून ठेवणारं हवं असतं. या चित्रपटाची कथा आणि त्यातील प्रत्येक पात्राचा संघर्ष प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे, मुख्य चित्रपटात प्रेक्षकांसाठी रहस्याचा एक मोठा खजिना दडला आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडेल."
अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर, अमित भानुशाली हे निर्माते आहेत तर यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर हिच्यासह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे हे मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Vishal Chaturvedi on ‘Hanuman Ansh’s Telugu Release: “Hyderabad Is the Land of Hanuman”

📰 Generate e-Paper Clip Vishal Chaturvedi on ‘Hanuman Ansh’s Telugu Release: “Hyderabad Is the Land of Hanuman” Mumbai: Writer-director Vishal Chaturvedi, speaking at a press conference in Hyderabad, opened up about ‘Hanuman Ansh’s Telugu release and the overwhelming demand from Telugu audiences. He said, “Hyderabad is the land of Hanuman. Whenever I come to Hyderabad […]

We should use our brain while doing our work, rather than just giving the prompt to ChatGPT: Paallavi Chatterjee

📰 Generate e-Paper Clip We should use our brain while doing our work, rather than just giving the prompt to ChatGPT: Paallavi Chatterjee Mumbai: Pallavi Chatterjee asks who should take responsibility when AI-generated content spreads online, particularly when the person featured in it has no idea that it exists. She believes the responsibility cannot rest […]