a unique-gift-for-fans-of-abhang-tukaram

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत

‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट !

Mumbai: कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण आस्वादक, रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कलाकारासाठी रसिकांचे प्रेम ही तेवढेच महत्त्वाचे असते.
आपला संत साहित्याचा अमूल्य ठेवा आपल्या संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेला ‘अभंग तुकाराम’ हा मराठी चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि त्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. हा टिझर चाहत्यांना एवढा आवडला की, प्रेमापोटी चाहत्यांनी या चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत करून पाठविला आहे. ‘हा केवळ कलाकारांचा गौरव नाही तर एका कलाकृतीला मिळालेली रसिकतेची उत्कृष्ट दाद आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.
या टिझरचा संस्कृत अनुवाद डॉ. श्रीहरी व्ही गोकर्णकर यांनी केला आहे तर डबिंगची जबाबदारी श्रीमती मनीषा पंडित, डॉ.श्रीहरी गोकर्णकर यांनी सांभाळली आहे. व्हिडिओ संकलन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग वेदांत नितीन जोग यांनी केले आहे. ऑपरेशनल सपोर्ट श्री. प्रांजल अक्कलकोटकर यांचा आहे. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि या प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र रसिकांची ही उत्स्फूर्त दाद ही माझ्यासोबत कायम असेल, अशी भावना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बोलून दाखविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Urvashi Rautela’s Grand debut at Red Sea international film festival closing ceremony, her diamond’s worth 25 cr wows Kingdom of Saudi Arabia

Urvashi Rautela’s Grand debut at Red Sea international film festival closing ceremony, her diamond’s worth 25 cr wows Kingdom of Saudi Arabia Mumbai: Indian actress and global fashion icon Urvashi Rautela once again proved why she’s a red-carpet favorite as she graced the Red Sea International Film Festival in Saudi Arabia. Arriving in a breathtaking […]