cinematic-universe-for-the-first-time-in-marathi-pritam-patil

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!

मराठी सिनेमात पहिल्यांदाच ‘युनिव्हर्स’ची भन्नाट संकल्पना घेऊन येणारा दिग्दर्शक – प्रीतम एस. के. पाटील !

Mumbai: यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रीतम पाटील यांनी ‘अल्याड पल्याड’च्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून थरारक अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या तंत्राचा आणि आशयाचा प्रयोग करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांमध्ये प्रीतम पाटील यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन रहस्य, थरार आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित कथा सादर करण्याची त्यांची हातोटी लक्षवेधी ठरली आहे. ‘अल्याड पल्याड’ सारख्या रहस्यमय थरारपटातून त्यांनी मराठी सिनेमात कमी हाताळल्या जाणाऱ्या हॉरर-थ्रिलर प्रकाराला नवं रूप दिलं. मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि धाडसी सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून येतो.
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असली, तरी मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न अत्यंत दुर्मीळ आहे. प्रितम पाटील यांच्या संकल्पनेमुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा, थरारक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळणार आहे.
भय, थरार आणि रहस्याचा जबरदस्त मिलाफ असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी एक खास ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीने लक्ष वेधणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस.के.पाटील सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा खूप समृद्ध आहे. निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच वेगळं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि ते समर्थपणे साकारही करतात. मात्र, मनोरंजनासोबत थरारक आणि मसालेदार अनुभवासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपटांना हॉररचा एक वेगळा तडका देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून हॉरर या जॉनरला हाताळताना अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा यांचा संगम साधला आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज ठरेल, असा मला विश्वास आहे. ” घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Nobody Gets Work Sitting Idle: Anupama Prakash Opens Up About Struggles, Networking And Survival In the industry

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Nobody Gets Work Sitting Idle: Anupama Prakash Opens Up About Struggles, Networking And Survival In the industry Mumbai: Actress and producer Anupama Prakash believes that in the entertainment industry, waiting for opportunities is never enough. She is Known for projects like Prabha Ki Diary, Farzi Kaka, Risknamaa and her recent […]