marathi-song-kahitari-vegale-valentine-day

नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’

Mumbai: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो. अभिनेत्री नम्रता गायकवाड यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ‘काहीतरी वेगळे’ करणार आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि अभिनेता तुषार कावळे याचे काही रोमँटिक फोटोज पहायला मिळतायेत. हे दोघे एकमेकांना डेट करतायेत का? अशा चर्चाना उधाण आलं आहे तर या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे.
हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा ठरतं. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.
गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, सह-दिग्दर्शक म्हणून मयूर परांकर यांनी साथ दिली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून स्वप्नील पाटील यांनी प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे. संगीत निर्मिती अफलातून म्युझिकची असून, प्रकल्प प्रमुख म्हणून रेखा मोरे आणि निलेश खंडागळे कार्यरत आहेत.
भावना, वास्तव आणि प्रश्नांची गुंफण असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं आजच्या पिढीला नात्यांकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडणारं ठरत आहे.

×
Date : 12 February 2026 Posted By : EDITOR
नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

माधुरी दीक्षित और सोनाली बेंद्रे पहली बार साथ आएंगी नजर, ‘कोण होणार करोडपती’ के ग्रैंड प्रीमियर में खुलेंगे दिलचस्प किस्से

📰 Generate e-Paper Clip माधुरी दीक्षित और सोनाली बेंद्रे पहली बार साथ आएंगी नजर, ‘कोण होणार करोडपती’ के ग्रैंड प्रीमियर में खुलेंगे दिलचस्प किस्से सोमवार, 12 अक्टूबर रात 9 बजे, सोनी मराठी और सोनी लिव पर होगा प्रीमियर Mumbai: माधुरी दीक्षित सवाल पूछेंगी और सोनाली बेंद्रे हॉट सीट पर उनके जवाब देंगी। खेल के साथ […]

हनुमान की अब तक की सबसे बड़ी लड़ाई की शुरुआत, जिओहॉटस्टारने जारी किया ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ सीजन 7 का ट्रेलर

📰 Generate e-Paper Clip हनुमान की अब तक की सबसे बड़ी लड़ाई की शुरुआत, जिओहॉटस्टारने जारी किया ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ सीजन 7 का ट्रेलर 23 अक्टूबर 2026 को दशहरे के सप्ताह में होगा प्रीमियर; इस लोकप्रिय फ्रेंचाइज़ी का अब तक का सबसे बड़ा अध्याय हनुमान को समय के पार एक ऐसी यात्रा पर ले […]