Vastu Astrologer Anand Pimpalkar in a Villainous Role

वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर खलनायकाच्या भूमिकेत

Mumbai: वास्तु व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे, तसेच आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर यांना अभिनयाचीही तितकीच गोडी आहे. याच आवडीच्या जोरावर त्यांनी आजवर १३ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. आता प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचा नवा आणि वेगळा रंग बहुचर्चित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ऐतिहासिक चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या निर्मितीअंतर्गत तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात आनंद पिंपळकर यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सेवेत असलेला ‘उदयराज मुनशी’ ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली आहे. भूमिका जरी छोटी असली, तरी तिचे महत्त्व आणि प्रभाव मोठा असून ती प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद पिंपळकर यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे आभार मानले. ‘या चित्रपटाच्या रूपाने शिवकालीन इतिहासाच्या गौरवशाली पर्वाचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले’, अशी भावना आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केली.
शौर्य, रणनीती आणि इतिहासाचा भव्य पट मांडणारा ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह जगभरात प्रदर्शित होत आहे.

×
Date : 06 February 2026 Posted By : EDITOR
वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर खलनायकाच्या भूमिकेत
News Image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Shreya Ghoshal and Sonu Nigam Reunite to Bring Romance to Life With ‘Tujh Mein Basi Meri Jaan’ From Prahaar, Featuring Rajkummar Rao & Wamiqa Gabbi

📰 Generate e-Paper Clip Shreya Ghoshal and Sonu Nigam Reunite to Bring Romance to Life With ‘Tujh Mein Basi Meri Jaan’ From Prahaar, Featuring Rajkummar Rao & Wamiqa Gabbi   Mumbai: The much-loved musical duo of Shreya Ghoshal and Sonu Nigam reunites with ‘Tujh Mein Basi Meri Jaan’, a soulful romantic track from Prahaar – […]

Vishal Chaturvedi on ‘Hanuman Ansh’s Telugu Release: “Hyderabad Is the Land of Hanuman”

📰 Generate e-Paper Clip Vishal Chaturvedi on ‘Hanuman Ansh’s Telugu Release: “Hyderabad Is the Land of Hanuman” Mumbai: Writer-director Vishal Chaturvedi, speaking at a press conference in Hyderabad, opened up about ‘Hanuman Ansh’s Telugu release and the overwhelming demand from Telugu audiences. He said, “Hyderabad is the land of Hanuman. Whenever I come to Hyderabad […]